द सिक्रेट - रोंडा बर्न | The Secret - Rhonda Byrne | Marathi Book Review



पुस्तक द सिक्रेट
लेखक रोंडा बर्न
अनुवाद डॉ. रमा मराठे
पृष्ठसंख्या २२४
प्रकाशन मंजुळ पब्लिशिंग हाउस
समीक्षण रोहित मोहिते
मूल्यांकन ४ | ५


द सिक्रेट हे आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेले पुस्तक आहे, जे २००६ च्या सुमारास प्रकाशित झाले. हे पुस्तक विचारांची उत्पत्ती आणि त्याचा आपल्या आयुष्यावर होणारा थेट परिणाम यावर भाष्य करते. लेखिकेच्या मते, विचारांचा आपल्या आयुष्यावर होणारा व्यापक परिणाम लक्षात घेता, आपले जीवन बदलण्याची शक्ती विचारांमध्येच आहे. हे वास्तव समाजातील एका विशिष्ट वर्गालाच ज्ञात होते आणि इतरांपासून जाणीवपूर्वक लपवण्यात आले. लपवलेले हेच गुपित द सिक्रेट च्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न लेखिकेने केला आहे.

आपल्या विचारांना असलेली फ्रिक्वेन्सी समान विचारांना आपल्याकडे आकर्षित करते आणि त्यातून ब्रह्मांडातील एक अदृश्य शक्ती आपल्या कल्पनेतील विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी कार्य करते. यालाच आकर्षणाचा सिद्धांत असे नाव दिले आहे. आपण इच्छित संपत्ती, मित्र, गाडी कधीही मिळवू शकतो. त्यासाठी त्या गोष्टी आपण ब्रह्मांडाकडे मागितल्या पाहिजेत, त्यावर विश्वास ठेवला पाहिजे आणि जे मागितले आहे ते स्वीकारण्यासाठी सज्ज राहिले पाहिजे.

या संकल्पनेबद्दल अनेक विचारप्रवाह आणि मतमतांतरे आहेत. हा सिद्धांत सर्व ठिकाणी कार्यान्वित असतो, याबाबत ठोस शास्त्रीय आधार मागणारे लोक प्रतिवाद म्हणून या संकल्पनेवर अविश्वासही दाखवतात.

या पुस्तकात इतिहासातील अनेक महान व्यक्ती, शास्त्रज्ञ, कवी, नेते यांच्या या संकल्पनेशी सुसंगत असलेल्या संदर्भांचा लेखिकेने उल्लेख केला आहे. या पुस्तकाच्या यशानंतर द नायक, द मॅजिक ही पुस्तकेदेखील हाच सिद्धांत अधोरेखित करतात. या सिद्धांताचा मानवी संबंधांवर होणारा परिणाम संपूर्ण जगात सकारात्मक बदल घडविण्यास सज्ज आणि सक्षम आहे.

एकूणच, आपण आपले विचार, भावना आणि कल्पना यांना योग्य दिशा दिली तर हवे ते साध्य करू शकतो. हा आकर्षणाचा सिद्धांत आजवर आणि यापूर्वीही आईनस्टाईन, सोक्रेटिस, शेक्सपियर यांनी अधोरेखित केला आहे. हा सिद्धांत अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवून त्यांना त्यांच्या स्वप्नांपर्यंत घेऊन जाण्याचा रस्ताच जणू या पुस्तकातून लेखिकेने दाखवला आहे.



संबंधित व्हिडिओ

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने