Think And Grow Rich | विचार करा आणि श्रीमंत व्हा | Napolean Hill | नेपोलियन हिल


लेखक नेपोलियन हिल
अनुवाद बाळ ऊर्ध्वरेषे
पृष्ठसंख्या २३८
प्रकाशन मंजुळ पब्लिशिंग हाऊस
समीक्षण आकाश जाधव
मूल्यांकन ३.५ | ५


व्यक्तिमत्व विकास या पुस्तक श्रेणीत टॉप १० मध्ये असलेलं आंतरराष्ट्रीय बेस्टसेलर पुस्तक म्हणजे "थिंक अँड ग्रो रिच." हे मला माहित असलेलं सर्वात जुनं self-help पुस्तक आहे.

"थिंक अँड ग्रो रिच" किंवा "विचार करा आणि श्रीमंत व्हा" असं लक्षवेधी नाव असलेलं (बऱ्याच जणांच्या दृष्टिकोनात हास्यापद) पुस्तक तुम्हाला एका रात्रीत नक्कीच श्रीमंत बनवणार नाही, पण आर्थिक विषयांत तुमची "मानसिकता" (mindset) बदलेल.

अँड्र्यू कार्नेगी (अमेरिकेतील पहिल्या पिढीतील उद्योजक) यांनी व्यक्तीगतरीत्या श्रीमंत होण्यासाठीचे गुपित या पुस्तकाचे लेखक नेपोलियन हिल यांच्यासमोर उघड केलं होतं. नंतर नेपोलियन हिल यांनी आयुष्याची वीस वर्षे खर्ची पाडून असंख्य लोकांच्या मुलाखती घेतल्या आणि ते गुपित पडताळून पाहिलं, ज्याने काही लोकांना अतिश्रीमंत श्रेणीत नेऊन बसवलं. या पुस्तकात ते गुपित उघड उघड लिहिलेलं नाही तर ते लपवून ठेवलं आहे. लेखकाच्या मते हे गुपित पुस्तक वाचताना तुमच्यासमोर अचानक प्रकट होईल. लेखकाने श्रीमंत होण्यासाठी काही भक्कम पावले सांगितली आहेत. अशाप्रकारची पद्धत मला कोणत्याही पुस्तकात लिहिलेली आढळलेली नाही. जरी आपण पुस्तकाबद्दल शंका घेऊ शकत असलो तरी पुस्तक वाचताना कुठेही लेखक आपल्याला फसवत आहे असं वाटत नाही.

बऱ्याच यशस्वी लोकांनी (जसे की रॉबिन शर्मा आणि संदीप माहेश्वरी) या लोकांनी हे पुस्तक वाचलं पाहिजे असं म्हटलं आहे. आर्थिक मानसिकता बदलण्यासाठी या पुस्तकात सांगितलेल्या पद्धती थोड्या विचित्र वाटू शकतात, पण जर तुम्ही लेखकावर विश्वास ठेवू शकत असाल तर या पद्धती अवलंबून पाहा.

थिंक अँड ग्रो रिच हे पुस्तक जवळपास १०० वर्षांपूर्वी लिहिलं असलं तरीही आजही उपयुक्त आहे आणि कालबाह्य वाटत नाही. या पुस्तकाचं मराठी अनुवाद मला तितकासा आवडला नाही. किंवा आपण म्हणू शकतो की अनुवादकाने मूळ पुस्तकाला न्याय दिला नाही. जर तुम्ही इंग्रजी वाचू शकत असाल तर मी नक्कीच म्हणेन की मूळ पुस्तक वाचा कारण लेखकाचे मूळ विचार समजून घेणे या विषयात इष्ट आहे.




संबंधित व्हिडिओ

Post a Comment

Previous Post Next Post