स्टीव्ह जॉब्ज: एक झपाटलेला तंत्रज्ञ - अच्युत गोडबोले, अतुल कहाते | Steve Jobs: Ek Zapatlela Tantradyna - Achyut Godbole, Atul Kahate | Marathi Book Review


पुस्तक स्टीव्ह जॉब्ज: एक झपाटलेला तंत्रज्ञ
लेखक अच्युत गोडबोले, अतुल कहाते
पृष्ठसंख्या १६४
प्रकाशन मेहता पब्लिशिंग हाऊस
समीक्षण आकाश जाधव
मूल्यांकन  | ५


स्टीव्ह जॉब्ज या व्यक्तिमत्वावर अनेक पुस्तके बाजारात उपलब्ध आहेत, पण अच्युत गोडबोले आणि अतुल कहाते लिखित स्टीव्ह जॉब्ज - एक झपाटलेला तंत्रज्ञ हे पुस्तक अनेक अर्थांनी वेगळं आहे. एकतर, मराठी भाषेत स्टीव्ह जॉब्जवर लिहिलेलं हे पहिलं पुस्तक आहे. अच्युत गोडबोले आणि अतुल कहाते यांनी हे पुस्तक विक्रमी वेळेत लिहून पूर्ण केलं आहे. हे पुस्तक स्टीव्ह जॉब्जचा जीवनप्रवास अगदी थोडक्यात आणि सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोचवतं.

अ‍ॅपल या कंपनीचा गॅरेज ते जगप्रसिद्ध होण्याचा प्रवास आणि स्टीव्ह जॉब्जचा जीवनप्रवास या दोन गोष्टी एकमेकांत इतक्या गुंतलेल्या आहेत की त्या वेगळ्या करणे जवळजवळ अशक्य आहे. लेखकांनी पुस्तकात हा गुंता योग्य रितीने हाताळला आहे. ज्यांना स्टीव्ह जॉब्जचं अधिकृत चरित्र वाचण्यासाठी वेळ नाही, त्यांच्यासाठी हे पुस्तक एक पर्वणीच आहे.

पुस्तकाचं मुखपृष्ठ अप्रतिम आहे. ते आपल्याला स्टीव्हची अ‍ॅपल कंपनीवर असलेली छाप दाखवून देतं. पुस्तकात स्टीव्हची काही कृष्णधवल छायाचित्रंही आहेत, ज्यामुळे वाचकांना पुस्तकाच्या नायकाशी कनेक्ट होण्यास मदत होते. नक्की स्टीव्ह जॉब्ज कोण होता? त्याला इतकी प्रसिद्धी कशी मिळाली? त्याने कोणती उत्पादनं बाजारात आणली? त्याची व्यवस्थापन पद्धत कशी होती? या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या पुस्तकात मिळतील. हे पुस्तक विशेषतः कॉम्प्युटर / सॉफ्टवेअर / इलेक्ट्रॉनिक्स या क्षेत्रातील लोकांना प्रोत्साहित करेल.




संबंधित व्हिडिओ


टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने