पुस्तक | शेअर बाजार |
लेखक | रवींद्र देसाई |
पृष्ठसंख्या | २१८ |
प्रकाशन | राजहंस प्रकाशन |
समीक्षण | आकाश जाधव |
मूल्यांकन | २ | ५ |
हे पुस्तक न वाचता शेअर बाजारात उतरणे म्हणजे पॅराशूट न बांधता विमानातून उडी मारणे.
अशी लक्षवेधी मार्केटिंग बघून साहजिकच पुस्तकात कोणतं ज्ञानभांडार आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता लागते. पुस्तकाचा फॉरमॅट अगदीच शैक्षणिक पुस्तकासारखा आहे. हे पुस्तक शेअर बाजारातील नवख्या गुंतवणूकदारांसाठी किंवा ज्यांना शेअर बाजार म्हणजे नेमकं काय हे जाणून घ्यायचं आहे त्यांच्यासाठी आहे.
नक्कीच पुस्तक वाचून तुम्हाला शेअर बाजारातील बऱ्याच गोष्टी समजतील; पण हे पुस्तक लिहून मोठा कालखंड उलटला आहे आणि लेखकाने त्यात कालानुरूप बदल केलेले नाहीत. त्यामुळे मला यातील बऱ्याच गोष्टी आऊटडेटेड वाटल्या. असं असलं तरीही पुस्तकात विषयाबद्दल सखोल लिहिलं आहे आणि वाचकांना समजेल अशा सोप्या पद्धतीने. तुम्ही मराठी भाषेत शेअर बाजार म्हणजे नक्की काय हेच शोधत असाल तरच हे पुस्तक वाचा; अन्यथा माझ्या मते आपल्याकडे यूट्यूब आहेच.