पुस्तक | बिकमिंग स्टिव्ह जॉब्ज |
लेखक | ब्रेंट श्लेंडर, रिक टेटझेली |
पृष्ठसंख्या | ४१२ |
प्रकाशन | सेप्टर प्रकाशन |
समीक्षण | आकाश जाधव |
मूल्यांकन | ३.९ | ५ |
एक बेफिकीर धनाड्य कसा द्रष्टा प्रवर्तक बनला याची कहाणी म्हणजेच "बिकमिंग स्टिव्ह जॉब्ज".
स्टिव्ह जॉब्जवर इतकी पुस्तकं प्रकाशित झाली आहेत की आता फक्त त्यांना देवत्व प्राप्त व्हायचं बाकी आहे. अर्थात, स्टिव्ह जॉब्ज हे व्यक्तिमत्व देखील तितकंच विलोभनीय आहे. या पुस्तकाचं मुखपृष्ठ लक्षवेधी आहे. पुस्तकात स्टिव्हच्या आणि त्याच्या आयुष्यातील महत्वाच्या व्यक्तींची रंगीत छायाचित्रेही दिली आहेत. ज्यांना स्टिव्ह जॉब्ज कोण आहेत हे माहित नाही, त्यांनी देखील अँपल कंपनीबद्दल कधी ना कधी तरी ऐकलं असेल.
स्टिव्ह जॉब्ज हे अँपल कंपनीचे सहसंस्थापक आहेत. त्यांनी अँपल वडिलांच्या गॅरेजमध्ये जगातील सर्वात मोठी तंत्रज्ञान कंपनी बनवली. पण त्यांचा हा प्रवास सुखकर नव्हता. अँपल यशाच्या शिखरावर असताना स्टिव्हची स्वतःच्या कंपनीतून हकालपट्टी करण्यात आली. नंतर त्यांनी नेक्स्ट कंपनी सुरू केली आणि पिक्सर या कंपनीत मोठी गुंतवणूक केली. पुढे अँपलमध्ये परतल्यानंतर स्टिव्हने जगाला उत्तम उपकरणं दिली. या सर्वांमध्ये स्टिव्ह कॅन्सरशी लढा देत होता, ते वेगळंच.
स्टिव्ह जॉब्ज हे एक अजब रसायन होते; हे तुम्हाला पुस्तक वाचताना प्रत्येक क्षणाला जाणवत राहील. स्टिव्हच्या अधिकृत चरित्रात जे प्रसंग मिसिंग आहेत, ते या पुस्तकात तुम्हाला वाचायला मिळतील. स्टिव्हच्या आयुष्यातील बऱ्याच घटना ऐतिहासिक दृष्ट्या (संगणक क्षेत्रासाठी) अत्यंत महत्वपूर्ण आहेत. त्यामुळे या पुस्तकाला एक वेगळं महत्व आहे.
जर तुम्हाला स्टिव्हबद्दल अधिक जाणून घ्यायचं असेल, तर हे पुस्तक जरूर वाचा किंवा स्टिव्हचं अधिकृत चरित्र वाचणे जास्त योग्य राहील.